Vipassana Meditation Events at Mahasthavir Chandramani Buddha Vihar, Ulhasnagar


एक दिवसीय विपस्सना शिबिर, महास्थविर चंद्रमणी बुद्ध विहार, उल्हासनगर


आदर्श विकास मंडळ उल्हासनगर ४ , महास्थवीर चंद्रमणी बुद्धविहार येथे भव्य एक दिवसीय विपश्यना ध्यान साधना शिबिर

आज दि, 10 सप्टेंबर 2022 रोजी संपन्न झाले.

त्यास आदरणीय सहाय्यक आचार्य आयु ओ.एन.वाकोड़े गुरुजी , आयु. शिवशरण गुरुजी आणि आयुष्मान मोरे गुरुजी यानी

हजर राहून शिबिरात उपस्थितीत उपासक व उपासिका याना ध्यान साधनेचे विशेष मार्गदर्शन केले.

कर्जत ते डोंबिवली पर्यंतचे विभागातील उपासक व उपासिका यांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.

शिबिरात सहभागी झालेल्या साधकांना मंडळा मार्फत भोजन व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

शिबिराचे यशस्वी आयोजन करण्या साठी मंडळाचे अध्यक्ष धम्मपाल तेलगोटे व संचिव एम ट़ी अंभोरे आणि इतर पदाधिकारी,

कार्यकारिणी सदस्य तसेच आदरणीय वाकोडे गुरुजी व त्यांचे सहकारी आणि धम्म सेवक यांचे महत्त्वाचे योगदान लाभले.

लाभार्थींनी ध्यान साधना शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे आभार व्यक्त केले.

आणि शिस्त बद्ध व उत्कृष्ठ आयोजना बद्दल प्रशंसा केली, असे शिबिर नेहमीच आयोजित करावे अशी इच्छा व्यक्त केली.